तुळजापूर (प्रतिनिधी)- दिवसे दिवस  उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वाढत्या तापमान पार्श्वभूमीवर आपले वाहने गरम (उष्ण) होवु नयेत म्हणून सध्या वाहानचालक आपली वाहने वृक्षाच्या सावली खाली लावत  असल्यामुळे वृक्ष हे वाहनतळे बनल्याचे सर्वञ दिसुन येत आहे.

पर्यावरणाचा समतोल न राखला गेल्यामुळे आज श्रीमंत चारचाकी, दुचाकी वाहनांना वृक्षाचे महत्त्व कळाले आहे. किती प्रगती केली तर त्याचा उपभोग घेण्यासाठी नैसर्गिकता लागतेच हे कळुन चुकले आहे. पण आता वेळ निघुन गेली आहे.

सध्या तापमान चाळीस अंशाचा वर जात असल्याने सकाळी दहा वाजल्या पासुन उष्णता वाढण्यास आरंभ होत आहे. उष्णता वाढताच लोंखडी पञा कव्हर असल्याने अर्धा तासात वाहने तप्त होत आहेत. यात दुचाकी लवकर तापत असल्याने टाकीतील पेट्रोल उष्णतेमुळे कमी होत असल्याने दुचाकी चालक याला चांगले वैतागुन जात आहे. टाकीतील पेट्रोल कमी होणे. नंतर गाडी तापणे हे यामुळे दुचाकी चालक वाहने वृक्षाच्या छायेखाली लावत आहेत. यामुळे वाहन तापत नाही  व इंधन कमी होत नाही. पण गाड्या अधिक आणि वृक्ष कमी या परिस्थितीमुळे वाहन चालक इमारत सावली शोधत आहे. एकंदरीत या उन्हाळ्यामुळे वाहनाबरोबरच वृक्ष लावणे, वाढवणे गरजेचे बनले आहे. सध्या सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह सोहळे अदि ठिकाणी वृक्षांच्या वणवा असल्याने या कार्यक्रम स्थळापासुन दूरवर वृक्ष असणाऱ्या शेतशिवारे, इमारती सावलीत वाहने लावावे लागत आहेत.


 
Top