धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत कोणाकोणाकडे हिंडत होते. त्यांची कारखाना घेण्याची धडपड धाराशिव जिल्हयात नव्हे तर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. न्यायालयाचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर तेरणा कसा पदरात पाडला ते सर्वश्रुत आहे. समाज माध्यमावरील मुलाखतील स्वत:च याची कबुली देणाऱ्या व भंगार चोरले म्हणणाऱ्या सावंताने मग कारखाना घेण्यासाठी एवढी धडपड का केली ? तिथ सगळ भंगार होत मग तुला ते घेण्यासाठी अनेकांचे उंबरठे कसे झिजवावे लागले हे तुच सांगत होतास. या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी प्रा.सावंत यांना दिले आहे. ते परंडा तालुक्यातील जवळा येथील प्रचारसभेत बोलत होते.

तेरणा कारखान्यावरुन हा माणुस माझ्यावर टिका करत आहे. तेरणा कारखाना माझ्याकडे आला तेव्हा 427 कोटी रुपयाचे कर्ज कारखान्यावर होते. त्यातील मी 227 कोटीचे कर्ज फेडले. पण नंतर राजकारण करुन या कारखान्याला कर्ज मिळु नये यासाठी अडचणी निर्माण केल्या. जिल्हा बँकेच्या बाबतीत अशी टिका केली गेली. बँकेने नागपूर बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. असेही ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

या प्रसंगी जावळा ता. परंडा येथे माजी आमदार ज्ञानेश्वर  पाटील, माजी आमदार राहुल मोटे, रणजित पाटील, प्रताप  पाटील, डॉ. चेतन बोराडे, मेघराज पाटील, रणजित मोटे, महादेव खैरे, धनंजय हांडे, संजय पवार, हनुमंत पाटील, अशोक गवारे, तात्यासाहेब गोरे, दादा गायकवाड, भाऊसाहेब गवारे, पुंडलिक गवारे,  प्रकाश कारकर, शंकर इतापे, शब्बीर पठाण आदीसह नागरीक व ग्रामस्थ उपस्थीत होते.


 
Top