तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील शिवपार्वती मंगल कार्यालय सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक व पत्रकार यांचा सत्कार सोहळा जैन कासार समाज तुळजापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलचंद व्यवहारे यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री कंदले, नगरसेविका सौ मंजुषा देशमाने, निताताई दिनेश क्षीरसागर सौ प्रिया गंगणे सौ सरोजाताई अमृतराव डॉक्टर अमृता अजित परमेश्वर महंताताई किशोर साठे सौ दीपालीताई अरुण यादगिरे पंडितराव जगदाळे, अश्विनीताई विशाल रोचकरी, संस्कृती सचिन कपाळे सज्जनराव साळुंखे, अजित कदम, सुनिल रोचकरी माऊली भोसले लखन पेंदे सागर कदम ,विजय कंदले, नरेश अमृतराव पंडितराव जगदाळे अनंत सावंत अंब्रीश जाधव गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, यांच्यासह इतर नगरसेवक, पत्रकार उपस्थित होते. जयश्रीताई कंदले ()वैशाली व्यवहारे ,विशाल रोचकरी चंद्रवदन शेटे ,आनंद कंदले पत्रकार सतीश महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभिक समाजाच्या यांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा जैन कासार समाजाचे अध्यक्ष सुभाष शेटे, व्यापारी फुलचंद व्यवहारे, यांच्या वतीने शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विशाल रोचकरी, सौ जयश्री कंदले, आनंद कंदले, डॉ सतीश महामुनी, शेटे यांनी भाषणे केली. यावेळी संस्कृती सविता सचिन कपाळे (वाशी)धाराशिव हिने इटानगर अरुणाचल प्रदेश येथे 69 व्या राष्ट्रीय शालेय ताईकांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या 32 किलो खालील गटात कास्य पदक जिंकले आहे म्हणून तिचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला
जैन कासार समाज अत्यंत कष्टाने तुळजापुरात व्यापार करतो समाजाची लहान मोठे प्रश्न आहेत याशिवाय जैन समाजाचे मंदिर विस्थापित होणार असल्यामुळे त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने नगरपरिषदेने महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी आपले प्रास्ताविकामध्ये सौ वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी प्रास्ताविकात केली.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी हा समाज तुळजापुरात संयमी शांत आणि व्यापार विषयक कामकाज करणारा समाज आहे निश्चितपणे नगरपरिषद आणि आपण व्यक्तिगत रित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक पद्माकर राव यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने जॉईन कसा समाजातील महिला आणि समाज बांधव उपस्थित होते.
जैन कासार समाज अत्यंत कष्टाने तुळजापुरात व्यापार करतो समाजाची लहान मोठे प्रश्न आहेत याशिवाय जैन समाजाचे मंदिर विस्थापित होणार असल्यामुळे त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने नगरपरिषदेने महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी आपले प्रास्ताविकामध्ये सौ वैशाली गुलचंद व्यवहारे यांनी प्रास्ताविकात केली.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी हा समाज तुळजापुरात संयमी शांत आणि व्यापार विषयक कामकाज करणारा समाज आहे निश्चितपणे नगरपरिषद आणि आपण व्यक्तिगत रित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक पद्माकर राव यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने सुधाकर शेटे ,संतोष शेटे ,चिंतामणी भांबरे , अनिल सोलापूर ,सुनील सोलापूरे ,प्रमोद शेटे ,बबलू रोकडे ,संदीप शेटे ,राहुल शेटे ,पद्माकर राव ,गाडे ,महावीर गडदे रवि दुरुगकर विलासराव रोकडे सचिन गडदे चैतन्य काटकर कसार समाजातील असंख्य महिला आणि समाज बांधव उपस्थित होते.
