तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अभूतपूर्व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाविक वर्ग प्रचंड संखेने श्रीतुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या श्रीकल्लोळ श्रीगोमुख तिर्थकुंडात स्नानासाठी मोठी गर्दी करीत असल्याने स्नानासाठी त्यास तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहराला सध्या तीन दिवसाआड अर्धातास पाणीपुरवठा केला जात आहे. मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा या दिवशी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करीत आहेत. सध्या लॉज, धर्मशाळा खोल्या भाडे पाणीटंचाईमुळे वाढल्याने सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब वर्गातील भाविकांची स्नानासाठी पन्नास  शंभय रुपये मोजण्याची ऐपत नसल्यामुळे सर्वसामान्य वर्गातील भाविक स्नानासाठी श्रीकल्लोळ श्रीगोमुख तिर्थकुंडावर गर्दी करीत आहेत. स्नानासाठी पहाटे तीन वाजता ही श्रीकल्लोळ गोमुख तिर्थकुंडावर रांगा लागुन स्नानासाठी तास ते सवा तास पहाटे लागत आहे. स्नानासाठी रांगा लावुन वेळ लागत असल्याने या कुंडामध्ये हातपाय धुवुन दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांना याचा फटका बसत आहे.


हातपाय धुवुन दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांनी पर्यायी सोय करावी 

हातपाय धुणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्रीगोमुख कुंडाजवळ लोंखंडी पाईपला छोटे छिद्रे त्यात पाणी सोडल्यास हातपाय धुणाऱ्या भाविकांची सोय होवुन त्याचा वेळ वाचणार आहे. अशी पर्यायी व्यवस्था पुर्वी कार्यान्वित होते. ती पण बंद करण्यात आली आहे. यामुळे श्रीकल्लोळ गोमुख कुंडावर भाविकांचा होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.


 
Top