धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श आचारसंहितेचा भंग करून नियमापेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगलेला तुषार किसनराव गेंदले रा. केज, जि. बीड यांच्या विरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार तुषार गेंदले हे केजकडून कळंबकडे येत असताना एस. टी. पॉईट परळी रोड कळंब येथे चेक पोस्ट वरील व्यक्तींनी गेंदले यांना चेक केले असता त्यांच्या जवळ आदर्श आचारसंहितेचा भंग करून नियमापेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगली होती. चेक पोस्टवरील भुजंग विनायक लोकरे कृषी पर्यवेक्षक यांच्या फिर्यादीनुसार तुषार गेंदले यांच्या विरोधात भादवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करीत आहेत.


 
Top