उमरगा (प्रतिनिधी) - अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच ईस्कॉन मार्फेत उमरगा शहरातील भाविकांसाठी सोमवार दि. 27 मे पासून दोन जूनपर्यंत श्रीमद्‌‍ भागवत कथा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी पाच ते आठ वेळेत कथा आणि कथेनंतर हरीनाम संकिर्तन, आरती व महाप्रसाद असे नियमित कार्यक्रमाचे आहेत.

पंढरपूर येथील वरीष्ठ भक्त भागवताचार्य श्रीमान श्रवणभक्ती प्रभुजींद्वारे ही कथा सांगण्यात येणार आहे. कथे दरम्यान विविध उत्सव देखील साजरे करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे की 'गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजेच भगवद्‌‍ गीता व श्रीमद्‌‍ भागवत यांचे श्रवण करण्याने भगवंतांचे स्मरण अखंडपणे होवू शकते. आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी नवविधा भक्तीपैकी म्हणजेच “श्रवणं कीर्तन विष्णोः स्मरणं पादसेवनम्‌‍ | अर्चन वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्॥“ श्रवणं ही विधी अत्यंत महत्त्वाची आहे.याद्वारेच भगवंतांचे कीर्तन व स्मरण करणे सहज शक्य होते. जे की मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय आहे म्हणजेच 'अंते नारायण स्मृती' आणि हीच मनुष्य जीवनाची सार्थकता सुद्धा आहे.

याच कारणास्तव केवळ सर्व जीवांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी साठी ईस्कॉन ही संस्था देशांमध्ये भगवद्‌‍ गीता, श्रीमद्‌‍ भागवत, हरीनाम व आपल्या सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार जगभर करीत आहे.गेली अनेक वर्षांपासून अखंडपणे करत आहे. मनुष्य जीवनात खऱ्या अर्थाने सुख, समाधान व शांती प्राप्त करण्यासाठी योग्य अध्यात्मिक ज्ञाना -शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. या भागवत कथेचे स्थळ शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिराच्या शेजारी असणारे आनंद मंगल कार्यालय महोत्सव साजरा होणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ईस्कॉन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top