उमरगा (प्रतिनिधी)- तालुका कृषी कार्यालयाकडे आरटीआयमधून मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निवेदन शुक्रवारी (दि.24) अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, 7 फेब्रुवारी 2023 रोजी उमरगा येथील कृषी कार्यालयाकडे आरटीआय अंतर्गत 2019 ते 2022 पर्यंत किती बियाणे, खते व औषधे आली आणि शेतकऱ्यांना किती वाटप झाली, याबाबत माहितीसाठी अर्ज सादर केला होता. परंतु संबंधित कार्यालयाने सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 28 मार्च 2023 रोजी द्वितीय अपील केले. परंतु अद्यापपर्यंत संबंधित कार्यालयाने माहिती दिली नाही. त्यामुळे दिलेल्या अर्जाप्रमाणे माहिती देण्याबाबत आपण सूचित करावे. यात भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. निवेदनावर छावाचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी, शेतकरी पंडित गायकवाड, महेश लोखंडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top