तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूरात मंदीरकडे येणारे रस्ते व मंदीर परिसरात शुक्रवार दि. 24 मे रोजी नगरपरिषद ने अतिक्रमण हटाव मोहीम राबवुन मंदीर परिसर भवानी रोड व कुंभार गल्ली रोड अतिक्रमणे मुक्त केला.

प्रभारी मुख्याधिकारी लक्षमण कुंभार स्वछता निरक्षृक दत्ता सांळुके यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राफावुन फुटपाथ वरील शेकडो अतिक्रमण हटवले रस्त्यावर  लावलेल्या पंधरा दुचाकींना ताब्यात घेतल्या. विशेषता भाविकांची सर्वाधीक  असणारा घाटशिळ वाहळतळ,ते सुवर्णश्वर मंदीर  या रस्त्यावर आलेले  अतिक्रमण हटवल्याने भाविकांना यामुळे दिलासा मिळाला. गुरुवार  सकाळी अकरा  ते एक वाजेपर्यंत मंदीर  परिसर भवानी रोड व कुंभारवाडा येथील अतिक्रमण काढण्यात आले आहे. तसेच पंधरा गाडी फळांचे बांगड्या उदबत्ती सोडा गाडी या गाड्या कडून प्रतिगाडयस दोनशे रुपये प्रमाणे 15 गाड्यांचे तीन हजार रुपये दंड करण्यात आला आहे.


 
Top