भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथरूड येथे भुम- नगर राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला  असून या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावातील परी डिजिटल बेंजो ची गाडी  ( एम एच 15 डीके 5509 ) धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे लग्नाच्या सुपारी निमित्त जात असताना भूम तालुक्यातील पाथरूड येथे हा अपघात घडला आहे.

डिजेची गाडीचे पुढचे टायर अचानक फुटल्याने चालकाने संतोलन बिघडले गाडी चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्याने होणारा मोठा अनर्थ टळला डीजे गाडीमध्ये 10 ते 12 कारागीर प्रवास करत होते. या प्रसंगी  2 कारागीरांनी गाडी हेलकावे देत असतानाच  उड्या मारल्या या मध्ये भाऊ अशोक घोडेराव वय 30 वर्ष रा. सातेफळ ता. जामखेड या व्यक्तीचा उडी मारल्याने डोक्यावर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच जवळील गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत भूम पोलीस घटनास्थळी येऊन पुढील कारवाई करत आहेत.

 
Top