धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. काही भागात बागांचे नुकसान झालेले आहे. घरांचे तसेच जनावरांचे शेड पडझड झाली आहे. धाराशिव तालुक्यातील सांगवी, ईर्ला तसेच तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, कुंभारी या भागातील नुकसानग्रस्त शेतांचे व घरांची पाहणी केली. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशा प्रकाराचे निवेदन धाराशिव जिल्हा काँग्रेसेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

काँग्रेस शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने,  सय्यद खलिल, प्रशांत पाटील, मेहबूब पाशा पटेल, अशोक बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, शिला उंबरे, सलमान शेख, नंदू क्षीरसागर, अमोल पाटील आदी हजर होते.

 
Top