तुळजापूर (प्रतिनिधी)- दोन दिवसांपूर्वी महसूल विभागातील कर्मचारी यांना नियम बाह्य गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी तुळजापूर येथील तहसील कर्मचाऱ्यांनी  बुधवार29पासून काम बंद आंदोलन चालू केले आहे.

महसूल विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मया-यांवर मागील काही कालावधीत फौजदारी गुन्हे दाखल होऊन अटक होण्याचे अनेक कारवाया झालेल्या आहेत. फौजदारी कारवाया होत असलेल्या ब-याच तक्रारी या वस्तुस्थितीवर आधारीत नाहीत. तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारी मध्ये काही तक्रारी ह्या प्रामाणिक व चांगले काम करणाऱ्या लोक सेवकां विरुध्द ही असतात. अशा तक्रारी मुळे लोकसेवकांना त्यांची शासकीय कर्तव्य बजावताना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा कित्येक प्रकरणांत लोक सेवकांचे मानसीक खच्चीकरण देखील होत आहे. सदर प्रकरणाचे अवलोकन केले असता या मध्ये शासनाकडुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1943 चे कलम 156(3) व 190 मध्ये सुधारणा केलेल्या अधिनियमांचा तसेच लोक सेवकाविरूध्द गुन्हे दाखल करताना तसेच त्यांना अटक करावयाच्या संद्रभात सर्वोच्य न्यायालय तसेच गृह विभागाकडून वेळोवेळी निर्मिती केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी तुळजापूर तहसील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू राहिले असे कर्मचारी यांनी सांगितले आहे. या आंदोलनात अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याने तहसिलदार कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते.

 
Top