तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात वादळी वाऱ्या सह झालेल्या अवकाळी पावसात शहरासह ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे  पंचनामे तात्काळ करा, 2023 चा पिकविमा सरसकट द्या, वीज बिल माफ करा, खरीप पेरणी पुर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बी-बियाणे खते घेण्यासाठी  मदत करा. अशी मागणी महाविकास आघाडीने तहसिलदार यांना निवेदन देवुन केली.

पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पेरणी पुर्वी व ज्यांची घरे उध्वस्त झालेली आहे अशा लोकांचा संसार उघडयावर आला आहे. त्यांना तातडीने निवारा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना शक्य तेवढया तातडीने शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. अशी मागणी महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी निवेदन देवुन केली.

 
Top