कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथे महावितरण कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. येथील कर्मचारी घरी झोपा काढत असून आम्ही ड्युटीवर आहोत असेच खोटे सांगून गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अनेक ठिकाणी तारा तुटणे किंवा लाईटच्या इतर समस्या निर्माण होत आहेत. मात्र येथील इंजिनियर व त्यांचे सहकारी कर्मचारी हे लोकप्रतिनिधी यांचे फोन उचलण्यास  टाळाटाळ करत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जर आमदार यांचे फोन कर्मचारी उचलत नसतील तर सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवारण महावितरण प्रशासन कसे करत असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कळंब शहरातील डिकसळ भागातील गेल्या दोन दिवसापासून छोटासा तांत्रिक बिगाड असल्याने तेथील नागरिकांनी वारंवार विनंती करून देखील इंजिनियर व त्यांचे कर्मचारी हे यांनी तेथील समस्या दूर न करता तेथील नागरिकांचे फोन उचलणे किंवा त्यांची भेट घेण्यासाठी टाळाटाळ केली गेली आहे. त्यामुळे या भागात गेल्या दोन दिवसापासून लाईट पुरवठा खंडित आहे. या भागातील नागरिकांनी इंजिनियर व त्या भागात सेवा देणारे लाईनमेन यांच्याशी संपर्क करून येथील समस्या सांगितली मात्र तेथील समस्येचे निवारण कर्मचाऱ्यांनी केले नसल्यास याबाबत कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी प्रयत्न केले मात्र आमदार कैलास पाटील यांचे फोन इंजिनियर यांनी उचलले नसल्याने तेथील लोकांचा समस्यांचे निवारण अद्यापही झालेले नाही. तदनंतर तेथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने तेथील विजेचे काम चालू करायला सांगतो असे आश्वासन देण्यात आले.


 
Top