कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासाठी खत निर्मितीचा प्रोजेक्ट आणून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. असे प्रतिपादन नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे.

कळंब येथील डॉ.वर्षा कस्तुरकर यांची इफको कंपनीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सकल कळंबकर यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमासाठी सह संघटन प्रमुख महाराष्ट्र प्रांत विजयराव देशमुख हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कथले चौक येथील महावीर भवन येथे सकल कळंबकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होते.

पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी कस्तुरकर यांनी प्रयत्न करावेत. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत. युवकांसाठी नवीन कामाची संधी उपलब्ध करून द्यावी. विविध योजना ही कंपनीच्या असतील त्या कळंब तालुकासह जिल्ह्यात राबविण्यात याव्यात. त्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभर लागेल असेही ठोंबरे म्हणाले. या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व नेते मंडळी, डॉक्टर, शेतकरी, पत्रकार उपस्थित होते.

 
Top