कळंब(प्रतिनिधी)- कळंब येथील  फ्रेंड्स फॉरेवर ग्रुपच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या वर्गमित्रांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी शहरातील या ग्रूपच्या वतीने वृक्षारोपण, पंढरीच्या दिंडीला अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. 

गतवर्षीपासून मित्रांच्या पाल्याचा दहावी व बारावीत परीक्षेत यश मिळविल्या बद्दल गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी तुळजाभवानी फंक्शन हॉल येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 10 वी च्या परीक्षेत कु. आस्था परमेश्वर मोरे हिने 92.20 टक्के, कु.अथर्व गोविंद रणदिवे याने सीबीएसई बोर्डात 90.00 टक्के ,अविष्कार राजाभाऊ नागटिळक याने  92.60 टक्के गुण  मिळविल्याबद्दल तर इयत्ता बारावीत सीबीएसई बोर्डात अभिषेक उदयचंद्र खंडागळे याने 71.00 टक्के ,रोहितकुमार कृष्णा पांचाळ सीबीएसई पॅटर्न 70.00 टक्के,आर्यन विक्रम मोरे याने 68.00 टक्के, प्रणव प्रकाश देशपांडे याने 72 टक्के गुण मिळवून  घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल  गुणवंत विद्यार्थी व पालकांचा  स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.जगदीश गवळी यांनी केले तर आभार परमेश्वर मोरे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कवडे, परमेश्वर मोरे, गोपाळ उबाळे,डॉ अभिजीत लोंढे, दिनेश अष्टेकर,डॉ भगवंत जाधवर, डॉ. सुधीर आवटे, डॉ. गिरीश कुलकर्णी, बाबासाहेब पवार, प्रा. जगदीश गवळी, उमेश बोंदर, दत्ता राखुंडे, शैलेश गुरव, सतीश घाडगे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top