धाराशिव (प्रतिनिधी)-इयत्ता पहिली ते आठवी वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात परंतु गेल्या तीन वर्षापासून मागासवर्गीय मुलींच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांसाठीची शिष्यवृत्ती, तसेच पहिली ते चौथी वर्गातील मागासवर्गीय मुलींचा उपस्थिती भत्ता गेल्या काही वर्षापासून देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनेची रक्कम तसेच उपस्थिती भत्तांची रक्कम तात्काळ मंजूर करावी. असे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत शिक्षण आयुक्त पुणे यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले आहे.

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळामध्ये राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, राज्य महिला कार्यकारणी सदस्य सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिषा कदम, अविनाश मोकाशे, दत्तात्रय मोहिते, सचिन भांडे, महेबूब काझी, राजेंद्र पवार, मालोजी वाघमारे, राजाभाऊ आकोसकर, सुरेश भालेराव, सचिन ताकपिरे, कैलास मोहिते, महेंद्र रणदिवे, नागनाथ मुडबे, सुधीर घोडके, शिवाजी साखरे, मिलिंद धावारे, लहू जगताप, अरूण पाटील, प्रफुल्ल झाडबुके, बब्रुवान भोसले, बाळासाहेब कांबळे,संतोष डोके, दिपक ठोंबरे, प्रदीप तांबे, लक्ष्मण घोडके, मिलिंद जानराव, ईलाही बागवान, मारुती काळे, ताकमोगे सर आदींचा सहभाग होता.

 
Top