तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह तालुक्यात तुफान वादळी वाऱ्यास झालेल्या पावसाचा मोठा फटका तालुक्यास खास करुन शेतीस  व महावितरण बसला. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरा सह परिसरातील विद्युत पुरवठा शनिवारी राञी नऊ तास बंद असल्याने नागरिकांसह भाविकांचे प्रचंड हाल झाले. बळीराजा खरीप पेरणी तयारी सुरु करीत असतानाच या वादळी वाऱ्याच्या अभुतपुर्व संकटाने खरीप पेरणी तयारी रखडली जाणार आहे.नुकसानचे तात्काळ पंचनामे करुन बळीराज्याला खरीप पेरणी पुर्वी शासनाने अर्थिक मदत केली तरच खरीप पेरणी शक्य होणार असल्याची शेतकऱ्यांनी सांगितले.

या वादळी वाऱ्याने शहरासह परिसरात प्रंचड थैमान घातले होते. जवळपास अर्धा तास शहरात नागरिक, भाविक जीव मुठीत धरुन घाबरलेल्या अवस्थेत घरात, मंदिरात, शहरात दुकानाचा आश्रय घेवुन वावरले. पाऊस कमी झाला की नागरिक व भाविकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर प्रचंड नुकसान समोर आले शाळांचा आवारातील अनेक वृक्ष उमळुन पडले. शाळांना सुट्या असल्याने जिवीत हानी झाली नाही. या काळात झालेल्या वादळी वाऱ्या सह झालेल्या पावसाचा जवळपास सर्वानाच म्हणजे शेतकरी, महावितरण, नागरिक, व्यापारी फटका यांना बसला. यात किलज येथे दोन म्हैशी विज पडून मयत झाल्या. तर शहरातील वेताळनगर भागातील घरावरचे पञे या वादळात उडून गेले.

धाराशिव रोडवरील फ्लॉवर शाळेच्या कंपाउंडवर चिंचेचे झाड पडले आहे. विद्युतची तार तुटली आहे. तसेच यशवंतराव कॉलेज येथे तीन, जवाहर नवोदय विद्यालय येथे एक झाड, सैनिकी शाळा येथे दोन-तीन झाड पडले आहेत. तसेच एसटी कॉलनी येथे कोयना वाकळे यांच्या पत्र्याच्या घरातील किचनवर  निलगिरीचे झाड पडले आहे. जीवित हानी झालेली नाही. मौजे तडवळा, बोरी आणि मोरडा येथील काही घरांचे पत्रे उडून गेले. ढेकरी येथे वादळी वाऱ्यामुळे जनावराच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.

 

शनिवारी रात्री शहर अंधारात 

शनिवारी सांयकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणच्या तारा तुटल्या. विद्युत खांब उखडुन पडल्याने शहराचा तसेच मंदीर परिसराचा विद्युत पुरवठा नऊ तास बंद झाल्याने शहरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याचा फटका नागरिक, भाविकांना बसला.  रात्र सर्वानी जागुन काढली. या वादळी वाऱ्यात महावितरणची विद्युत पुरवठा पुर्णता कोलमडल्याचे दिसुन आले.


वादळी वाऱ्यामुळे मसला खुर्द, येथील बलभीम कुभार व सौ.पद्मिनी महादेव माने यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. श्रीमती.विमल गजेंद्र कुंभार याच्या नर्सरीचे नुकसान  झाले.

 
Top