तेर (प्रतिनिधी)- तेर येथील रेवणसिद्ध लामतुरे यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपस्तंभ गौरव ग्रंथाचे प्रकाशन श्री शैल्य पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. चन्नासिद्धराम  शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  श्रीगुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री श्री 108 श्री गुरु शांतविरलिंग शिवाचार्य महाराज औसेकर यांचे उत्तराधिकारी, आ. राणाजगजितसिंह पाटील, हभप नामदेव महाराज वासकर, हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप दीपक महाराज खरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, डॉ. महेंद्र कल्याणकर, व्ही. व्ही .गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक हभप दिपक महाराज खरात यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले तर आभार नंदकिशोर लामतुरे यांनी मानले.

 
Top