तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू  संग्रहालयातील रिक्त जागा भरण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर विभाग प्रमुख गोरख माळी यांनी पुरातत्व विभागाचे संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै .रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील सहाय्यक अभिरक्षक, एक रखवालदार, एक लिपिक यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे उर्वरित कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. तरी विनंती की, तेर येथील  संग्रहालयातील रिक्त जागा ताबडतोब भरण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर विभाग प्रमुख गोरख माळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

 
Top