धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत त्यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांगिण विकासासाठी नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. अशा शब्दात माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थित प्रचंड जनसमुदायासमोर आपले विचार व्यक्त केले.

महायुतीच्या उमेदवाराच्या अंतिम टप्प्यातील प्रचारार्थ शनिवारी पाडोळी (आ.) येथे अँड.व्यंकटराव गुंड यांनी  भव्य सभेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर भाजपचे जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, अँड. व्यंकटराव गुंड, अँड. मिलिंद पाटील, बाबुराव पुजारी, दत्ता सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अँड. गुंड यांनी उपस्थित मतदारांना भारताला बलशाली आत्मनिर्भर व आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी  घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले कारण हे मत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी उपयुक्त होणार असल्याचे सांगितले. यावेळी  संगमेश्वर स्वामी, नीलकंठ पाटील, दुर्गाप्पा पवार, भरत दाजी गुंड, अजित पवार, अँड.शरद गुंड, बालाजी पवार, राजेंद्र कापसे,  रामदास आप्पा गुंड, तानाजी गायकवाड, किरण पाटील, लक्ष्मण घुले, नवनाथ घुले, तुकाराम जाधव, दिलीप सोनटक्के, संदिपान गुंड, महादेव सूर्यवंशी, तसेच महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top