धाराशिव (प्रतिनिधी)- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 रुपयाची रोख मदत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना देऊ केली आहे. ओमराजे यांच्या मातोश्री आनंदीदेवी यांच्याकडे ही रक्कम सुपुर्त केली. ओमराजे यांनी त्या मुलीचे आभार मानले व तुझा हा भाऊ तुला कधीच विसरणार नसल्याचे सांगितले.

सध्याच्या युगात जिथे राजकारणाचा विचका झाला आहे. बहुतांश राजकारणी लोकांना शिव्या देत आहेत. अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी ओमराजेंना मदतीचा ओघ सूरु झाला असुन दौऱ्यादरम्यान लोकांचं प्रेम, आपुलकी बघून ओमराजेंना कृतकृत्य झाल्याची जाणीव झाल्याचे ते म्हणतात. अनेक सामान्य नागरिक जे स्वतः आर्थिक रित्या दुर्बल आहेत असे लोक स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी आर्थिक मदत घेऊन पुढे येत आहे. त्यांच्या मदतीची रक्कम ही करोडो रुपयांना भारी असल्याचेही मत ओमराजे यांनी व्यक्त केले आहे. 


महायुतीचा आरोप

लोकसभा निवडणुकीत एका शेतकऱ्याने, एका सैनिकाने, एका लहान मुलीने ओम राजेनिंबाळकर यांना निवडणुकीसाठी पैसे दिले. याविषयी बोलताना भाजपाचे लोकसभा संयोजक नितीन काळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी जनतेच्या भावनेशी खेळू नये. असे म्हणत उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी प्रचंड पैसा खर्च केला. त्या लहान मुलीची भावना पायदळी तुडवली असा आरोप नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी विनोद गपाट, अण्णा पवार उपस्थित होते.


 
Top