धाराशिव (प्रतिनिधी)-सारोळा गावच्या लोकनायकाला सर्वांचे लाडके प्रशांत रणदिवे जे काम हातात घेतले ते पूर्ण केल्याशिवाय कधीच माघार नाही. अशा या व्यक्तीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

 जवळचा माणूस असो किंवा विरोधक असो काम होतंय तर होतंय नाहीतर नाही. आपण आजपर्यंत पंधरा वर्षे गावाची सेवा केली करत हि आहात जलयुक्त  शिवार असेल, आरोग्य तपासणी असेल, लाईटचा,पाण्याचा, गावातील स्वच्छतेचा (घंटागाडी ) विषय,  घराघरासमोर केलेली आंब्याची वृक्ष लागवड असेल. के. प्रा. शाळेचे नियोजन असेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर   यांनी  लिहिलेले “ सविधान “ ग्रा.पं कार्यालयात बसवले, सारोळा गावाला उत्कृष्ट असा पुरस्कार 10 लाखाचा मिळवून दिलात, शिंदेवाडी गावालगत क्रिकेटचे मैदान करून त्याच्या बाजूने पूर्ण वृक्ष लागवड करून एक वेगळी संकल्पना समोर आणली, गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली, आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेतले, ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार सर्व ऑनलाईन करून घेतलात, काही  सामाजिक संस्थेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी शिलाई मशीन असेल शेळीपालन असेल किंवा आर्थिक मदत असेल आपण मिळवून दिलीत, गावातील महिला बचत गटांना आर्थिक मदत मिळवून दिलीत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरकुल योजना जे आजपर्यंत इतिहासात कुणीच केली नाही ती 400 कुटुंबाला आपण करून दिलीत, गावातील सुंदर असे रस्ते, नालीचे व्यवस्थित नियोजन, आरोग्य तपासणीसाठी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून केलेले नियोजन असेल अशी कित्येक कामे केलीत आणि करत हि आहात आपल्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो हीच आपल्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी चरणी, सारोळा गावचे ग्रामदैवत संत शिरोमणी रामप्रभू महाराज, बालपीर साहेब, म्हसोबा, श्री ज्योतिबा  चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य व निरोगी लाभो.


 
Top