धाराशिव (प्रतिनिधी)-श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबादच्या मुख्य कार्यालयात 65 वा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सकाळी 07.15  वा संपन्न झाला.या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी  यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने 65 वा महाराष्ट्र दिन  साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोरे, प्रशासन विभाग प्रमुख  नितीन हुंबे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top