धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने नागपूर येथे आयोजित वरिष्ठ (महिला/पुरुष) गट स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या  वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे  दि.28 ते 29 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, फुटबॉलचे सचिव जावेद शेख, ज्ञानेश्वर भुतेकर, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

विविध क्रीडा प्रकारचा निकाल पुढीलप्रमाणे महिला - 100 मी श्रेया डांगे, शेख सानिया, 200मी- जानव्ही यादव, गौरी मोहिते, 400 व 1500 मी- आंबेकर स्नेहल, वाघमारे अनुजा, 1500 मी -रेवडकर वैष्णवी, 10 किमी राणी सुतार,100 मी हर्डल्स व तिहेरी उडीप्रणिता जाधवर.

पुरुष-100 मी ज्ञानेश्वर सावंत, देव कांबळे, 200 मी सोनटक्के दीपक, कोकणे स्पंदन, 400मी शेख अल्ताफ, यादव सोमनाथ , 800 व 1500 मी विराज जाधवर, करण बिक्कड, रोहित कांबळे, 5 व 10 किमी पंकज राठोड, नितेश चांदकापुरे, प्रदीप यंपाळे, गोळा फेक व थाळी फेक - मुकसद पठाण, इर्शाद शेख, भाला फेक- हेमंत जाधवर, अमर जाधव,20 किमी चालणे-अरुण राठोड, बबलू जाधव,110 व 400 मी हर्डल्स विवेक राठोड, टोपाजी जाधव, उंच उडी-प्रतीक मुंगळे, विश्वजित मेंगळे इत्यादी खेळाडूंची निवड झाल्याचे स्पर्धा प्रमुख संजय कोथळीकर,रोहित सुरवसे,जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांनी जाहीर केले.


 
Top