धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यावतीने ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे मराठीपणाचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या वेळी करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, विद्यार्थि जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार, धाराशिव शहर उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे,सामजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव,धाराशिव महिला अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष अमीना शेख, धाराशिव शहर सचिव सुजित बारकुल,धाराशिव शहर अल्पसंख्यांक उपाध्यक्ष सना शेख, वाघोली महिला शाखा अध्यक्ष हजुबी शेख, सरफराज सय्यद,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top