कळंब (प्रतिनिधी)- श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना“ उपक्रमा अंतर्गत आरोग्य सेवा रुग्णालय, शिक्षण,व्यवसाय कन्यादान साठी जवळ पास शहरातील व ग्रामीण भागातील  लाभ धारकांना आर्थिक साह्य देण्यात आले.                                         

सामाजीक दायीत्व व मानवतेच्या भावनेतून श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना उपक्रम श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थेच्या  वतीने राबविले जात आहे.  सर्व सामान्य समाजातील  पैश्या अभावी रखडलेल्या होतकरू गरजूंना व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य आणि कन्यादान  तसेच ईतर कारणां करीता संस्थेच्या वतीने त आर्थिक साह्य करून त्यांना सक्षम केले जात  असल्याचे लालासाहेब टोणगे यांनी सांगितले.

संस्था व्यवसाय वाढविण्यासाठी व इतर कारणा साठी आर्थिक साह्य प्रदान करते. श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थेच्य्‌ा वतीने वृद्ध व अनाथ व्यक्ती यांना शिवभोग सामुदायिक स्वयंपाकघर वृद्ध व अनाथ मुलांसाठी, श्री छत्रपती गौशाळा, श्री छत्रपती आरोग्य मदत कक्ष योजना, श्री छत्रपती पर्यावरण (पक्षी व वृक्ष) असे विविध उपक्रम राबविण्यात येत  आहेत. आर्थिक दृष्टया सह्य करून त्यांना आर्थिक सक्षम करणे  हा समतेचे राजे राजे शिवराय यांच्या समतेच्या विचारातुन श्री छत्रपती आर्थिक साह्य योजना अंतर्गत प्रत्यक्षपणे कृतीतून उपक्रम राबविला जात आहे. समाजातील गरजूंनी आर्थिक साह्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  श्री छत्रपती चॅरिटेबल फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष व सभासद यांनी केले आहे.


“श्री छत्रपती आर्थिक साह्य योजणे“ मार्फत  कळंब येथील अमृत रमेश नकाते या हॉटेल व्यवसायिकांला- व्यवसाय वाढीव साठी या  संस्थेने पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे.


 
Top