धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रात घोडदौड चालू आहे. सोमवार दि. 27 मे रोजी लागलेल्या एसएससी परिक्षेचा धाराशिव जिल्ह्याचा निकाल 95.88 टक्के लागला आहे. 

जिल्ह्यातून एकूण 21 हजार 769 विद्यार्थी एसएससी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 20 हजार 853 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 11 हजार 782 मुले होती. तर 9 हजार 987 मुली होत्या. मुलांपेक्षा पास होण्याचे प्रमाण मुलींचे जास्त आहे. मुलामध्ये 11 हजार 130 विद्यार्थी पास झाले. तर मुलींमध्ये 9 हजार 743 विद्यार्थींनी पास झाल्या आहेत. जिल्ह्यात नावाजलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव या शाळेचा निकाल 98.97 टक्के इतका लागला आहे. एकदर शैक्षणिक क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याची घौडदौड कायम आहे. 


 
Top