परंडा (प्रतिनिधी) - येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाने  यशाची उज्वल परंपरा कायम राखत उत्कर्ष गजानन कोठावळे या विद्यार्थ्याने सर्व विषयात 100% गुणांसह  दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विद्यालयातील 63.33% विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर 32.22% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 2.22% विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा सरासरी निकाल 98.88% लागला आहे.

  कल्याण सागर विद्यालयातील कोठावळे उत्कर्ष 100 %, सांगळे प्रणव 96.20%, सुरवसे अथर्व 96.20%, थिटे संस्कार  95.00%, नरुटे तेजस 94.80%, कदम नम्रता  93.60%, तरटे किरण 93.40%, नरुटे प्रणवी 92.60%, जंगाले गौरव याने 91.00% गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर, सचिव प्रज्ञाताई कुलकर्णी, समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड यांच्यासह सहशिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे  रोहित रासकर, दादासाहेब सुरवसे अभिनंदन केले आहे.

 
Top