धाराशिव  (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्याने घरे, दुकाने, कुकुटपालन शेड, फळबागा यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत खूप मोठे आर्थिक नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना अपवादात्मक व विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत  उपलब्ध करून देण्यात यावी .तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्यावेत यावी अशी मागणी पिंपरी येथील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दि.27 मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.25 मे रोजी सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार तडाखा गेल्या आठवडाभरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला आहे. तर काही हॉटेल व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून यामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेलमधील सर्व सामान, पत्रे दूरवर उडून गेले आहेत. काही  कुक्कुटपालनच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक कुक्कुटपालनाचे शेडमधील पक्षी दगावले असून, पत्रे उडून गेले आहेत. तसेच गावातील इतरही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून त्याप्रमाणे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविण्यात यावा. तर नैसर्गिक आपत्तीच्या निकषाप्रमाणे अनुज्ञेय अनुदान व प्रत्यक्ष झालेले नुकसान यामध्ये मोठी तफावत असून काही ठिकाणी फारच मोठे नुकसान झाले आहे. अशा काही ठराविक ठिकाणी जेथे नुकसानीची व्याप्ती फार मोठी आहे, अशा ठिकाणी अपवादात्मक बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांनी केली आहे.

 
Top