परंडा (प्रतिनिधी) -परांडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा 2017 पासून सलग आठव्या वर्षी 100% निकाल लागला आहे.चालू वर्षी सुद्धा 100% निकाल लागला आहे.

गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय असे- सुप्रिया कुमार बनसोडे 76.20%, फातेमा शफीक कुरेशी 73.60%, माळी तुनुजा ज्ञानेश्वर 72.60 टक्के गुण घेतले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक दिनकर पवार, भाऊसाहेब सुर्यवंशी, नामदेव पखाले, रामचंद्र इंगळे, सतीश खरात, आबासाहेब माळी, शुभांगी देशमुख, मीनाक्षी मुंढे, रेखा उसराटे, चंद्रकांत सुरवसे, गीतांजली मंडलिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी शिंदे, उपाध्यक्ष कुमार बनसोडे, सदस्य अब्दुल गनी हन्नुरे, सर्व पालक यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top