तुळजापूर (प्रतिनिधी) -महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत उन्हाळा सुट्या, लनसराई पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी  लाखो भक्त दाखल झाले आहेत. पाणीपुरवठा व वीजवितरण यंत्रणा पुर्णता कोलमडुन खेळखंडोबा झाल्याने याचा मोठा त्रास लाखो देविभक्तांसह शहरवासियांना मोठ्या प्रमाणात बसल्याने आपातकालीन नियोजन कुठे आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.

मागील आठवड्या पासुन शहराचे विजवितरण पुर्णता कोलमडल्याचे दिसुन येत आहे. विशेषता रात्री अपरात्री सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत होता. शुक्रवार रात्री तर सलग नऊ तास शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. विशेष म्हणजे मंदीराकडे येणारे रस्ते, मंदीर महाध्दार परिसरात अंधार साम्राज्य निर्माण झाले होते. वीजवितरण बाबतीत नियोजनाचा पुर्ण फज्जा उडाल्याचे दिसुन आले. रात्री वीज गायब होताच तिर्थक्षेत्र तुळजापूरात दाखल होणारे भाविक अक्षरशा जीव मुठीत धरुन निवास ठिकाणी जात होते.

यावेळी भाविकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या अन्नदात्याला कुठल्याही अप्रिय घटनेला सामोरे जावे न लागल्यामुळे व देवबलवत्तर म्हणून कुठलीही घटना न घडल्याने शहरवासियांनी सुटकेचा श्वास घेतला. वीज बरोबरच पाणीपुरवठा वितरण पुर्णता सातत्याने कोलमडल्याने भाविकांना अक्षरशा पाणी जादा पैसे देवुन विकत घेऊन वेळ भागवावी लागली. शहराचे पाणीपुरवठा कधी पाईपलाईन फुटल्याने तर कधी विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराचा पाणीपुरवठा वितरण कोलमडल्याचे दिसुन आहे. वीज, पाणी बाबतीत योग्य ती दक्षता प्रशासकीय पातळीवर न घेतल्याने भाविक, शहरवासियांना याचा मोठा फटका बसला. तसेच शहराचा अर्थकरणावर ही मोठा फटका बसल्याचे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले. वीज, पाणी बाबतीत भाविक, जनतेला लोकप्रतिनिधि  व  प्रशासनाने वा-यावर सोडल्याचा आरोप यावेळी केला गेला. लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रिया संपन्न होताच प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये काहीसे बेफिकरीचे वातावरण निर्माण झाल्यानेच याचा त्रास भाविक व शहरवासियांना भोगावा लागला.

 
Top