धाराशिव (प्रतिनिधी)-येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलने 10 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले असून शाळेचा शेकडा निकाल 99.74.% लागला आहे. तर 09 विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेत 100%. गुण प्राप्त केले आहेत.

प्रशालेतील गुणवत्तेचा आलेख पाहता 95 % पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 67 विद्यार्थी आहेत. तर 90 % पेक्षा जास्त गुण घेणारे 140 विद्यार्थी आहेत. विशेष प्राविष्य मिळविणारे 297, प्रथम श्रेणी 72, द्वितीय श्रेणी मध्ये 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी विषयात 5, संस्कृत विषयात 19, गणित विषयात 4, विज्ञान विषयात 3 तर सामाजिक शास्त्रे विषयात 1 विद्यार्थी यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेच्या वतीने मंगळवारी करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी प्रकाश पारवे, प्राचार्य पी. एन. पाटील, उपप्राचार्य एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक व्हि. के. देशमुख व पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशालेतील विद्यार्थी प्रतिक पाटील, ओम सोनटक्के, अस्मिता चादरे, वेदिका राठोड, वरद बोचरे, श्रेया साळुंके, साक्षी चव्हाण, रेवती जावळे, रेवती लाडके यांनी 100 % गुण प्राप्त केले आहेत. तर 95 % पेक्षा जास्त गुण 67 विद्यार्थ्यानी मिळविले आहेत. यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते प्रशालेचे वतीने करण्यात आला. प्रसंगी कार्याध्यक्ष एम.डी देशमुख, अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, प्राचार्य पी. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी व शाळा समूहाचे वतीने करण्यात आले.

 
Top