धाराशिव (प्रतिनिधी)-श्रीराम नवमी निमीत्त समता मध्यवर्ती गणेश मंडळाच्य वतीने शुध्द व थंड पिण्याचे जार पाणपोईचे उदघाटन युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील व मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या तीव्र उन्हाळा व दुष्काळी परिस्थीती असलयाने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. चैत्राच्य उन्हाने जिवाची काहीली करणाऱ्या तापमानात उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या विद्यार्थी, अबाल वृध्द, महिला, कामगार व वयस्कर वाटसरु  यांची प्रचंड गैरसोय होते. गोरगरीबांना 20 रु देऊन विकतचे पाणी बाटली घेणे परवडत नाही. या मुळे तहानलेल्यांची तृष्ण भागविण्यासाठी सामाजीक बांधीलकीतुन नागरीकांना मोफत शुध्द व थंड पिण्याचे पाणी मिळावे या हेतुने पाणपोई करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा चे शहराध्यक्ष तथा समता मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजित साळुंके याच्या संकल्पनेतुन दर वर्षी सामाजीक उपक्रम केले जातात. शुध्द व थंड पिण्याचे पाणपोईचे या वर्षी चे 12 वे वर्ष होते. रामनवमी पासुन उन्हाळा सपेपर्यत पाणपाई सुरु राहील, धाराशिव शहरातील एकमेव शुध्द व थंड जारची पाणपोई उपक्रमाचे सर्वत्र कैतुक होत आहे.

यावेळी समता मध्यवर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संदिप साळुंके, ॲड. अमोल वरुडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिबाळकर, समर्थ हाजगुडे, निखील शेरखाने, प्रथमेश दडपे, अनिकेत गवळी, अमीत साळुंके, अक्षय नायगावकर, मयुर माळी, बालाजी करपे, सागर माळवदकर,  शेरकर, समर्थ लाव्हरे, गणेश सरडे, श्रीकृष्ण रेणके सर, राजेश कारंडे, माऊली पंडीत, रवि शेळके, आदी मंडळाचे सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


 
Top