धाराशिव (प्रतिनिधी)-देशात साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या सत्ता काळातील समस्या मोदी सरकारने दहा वर्षात संपविल्या. आता भाजपचा पुढील सत्ताकाळ म्हणजे सर्र्वांच्या विकास आणि समृध्दीतून देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा असणार आहे. त्यामुळे मोदी विषयी लोकांत विश्वासर्हता असल्याने देशात मोदी लहर आहे. असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

शहरातील प्रतिष्ठान भवन येथे शनिवारी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश देशमुख, इंद्रजित देवकते, प्रविण पाठक, राजसिंहा राजेनिंबाळकर, आण्णा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना उपाध्ये म्हणाले की, समान नागरी कायदा, एक देश-एक निवडणूक, 70 वर्षांतील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, गरिबांना आर्थिक बळ देणयासाठी पाच वर्षे मोफत धान्य, विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगासाठी प्रोत्साहन, अशा अनेक विविध योजनांतून देशाला समृध्द करणारे भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे. रेल्वेसेवेचे जाळे वाढवून प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचे देशव्यापी कार्यक्रम राबविण्याचा मोदी यांचा संकल्प आहे. 2019 मध्ये मोदी सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील सर्व 75 आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत, असेही उपाध्ये यांनी या पत्रकार परिषदेत नमुद केले.



 
Top