तुळजापूर (प्रतिनिधी)-विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार दि. 14 एप्रिल रोजी विविध समाजपयोगी उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी  रविवारी पहाटे पासुन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ आंबेडकर प्रेमी, विविध पक्षांच्या मंडळीनी गर्दी केली होती. विविध सामाजिक संघटना, आंबेडकर प्रेमी यांनी महामानव डॉ. आंबेडकर  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महिला वर्गाची प्रचंड गर्दी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लोटली होती. संघर्ष युवा प्रतिष्ठान भीमनगर  यांच्यावतीने युवा नेते सागर कदम यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात  100 रक्तदात्यांनी रक्तदान करुन महामानवाला अभिवादन केले. महायुती तर्फ रॅली काढुन महामानवास विनोद गंगणे, सचिन रोचकरी, विजय गंगणे, यांनी अभिवादन केले. सुप्रसिद्ध गायक जगदीश गोडसे यांनी पुतळा परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जीवनावरील भिम गिते सलग बारा तास गावुन महामानवाला श्रंध्दाजली अर्पण केली.


 
Top