तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर (खुर्द) येथे दि 13 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 37 रक्तदात्याने रक्त दान करून शिबिरात सहभाग नोंदवला. या शिबिरास समाजसेवक पंकज शहाणे यांनी सदिच्छा भेट देऊन सामाजिक उपक्रमाची माहिती घेऊन कौतुक केले.

यावेळी शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, सोमनाथ भोजने आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी विनायक वाघचौरे, सुशांत साबळे, वैभव भोजने, रोहित भोजने, अर्जुन भोजने, अमर भोजने, खंडू भोजने, अनिकेत भोजने, नाना भोजने आदींनी परिश्रम घेतले. मल्लिकार्जुन ब्लड सेंटर, सोलापूर याचे सहकार्य  लाभले. 
Top