तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ लाखोच्या संख्येने भाविक येणार असल्याने यांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी दि. 21 ते 25 एप्रील 2024 या कालावधीत मंदीर सलग बावीस तास दर्शनार्थ खुले ठेवण्यात येणार आहे.

चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांची वाढती संख्या विचारात घेता, भाविकांना श्री देविजींचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत श्री देविजींचे सकाळचे चरणतिर्थ पहाटे 01 वाजता होऊन सकाळची पुजेची घाट 06  वाजता होईल.


बिडकर पायऱ्या वरुन मंदिरात प्रवेश!

चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त श्री देविजींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता, भाविकांना श्री देविजींचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून, दि.  21 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तथापी, शनिवार दि. 20 एप्रिल 2024  रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपासून घाटशिळ रोड पार्कींग येथून बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.


 
Top