धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ग्रीन लॅन्ड इंग्लीश स्कूल मध्ये धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती दिनी प्रतिमा पुजन संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, प्रशालेच्या प्राचार्या अनंतलक्ष्मी स्वामी, जिल्हा संस्कार भारती जिल्हाकार्याध्यक्ष अनिल निवृत्तीराव ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर नंदकिशोर भन्साळी यांच्या हस्ते पुजन करुन श्रीफळ वाढविण्यात आले. या प्रसंगी उपमुख्याध्यापिका उल्का पाटील शिक्षिका अर्चना सातपुते, अनंत बटटू विद्यार्थी उपस्थित होते.

 

 
Top