भूम (प्रतिनिधी)-महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती भूम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. रविवार दि 14 एप्रिल 2024 रोजी महामानव, भारतरत्न , भारताच्या संविधानाने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती  भूम तालुक्यात साजरी करण्यात आली. 

या निमित्ताने प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करून, पुष्पहार घालुन, व  पुष्पसुमन वाहुन त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे यूवक जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर,  भूम-परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, ता. चिटणीस संतोष अवताडे, तालुका चिटणीस लक्ष्मण भोरे, तालुका प्रसार  प्रमुख शंकर खामकर,  मराठवाडा प्रदेश कामगार सेल सदस्य सचिन बारगजे,  विधीज्ञ तालुका प्रमुख संजय शाळू,  भूम शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, संदीप महानवर, गजेंद्र धर्माधिकारी, युवा अध्यक्ष गणेश  भोगील,  उपाध्यक्ष अमोल लोंढे,  रमेश बगाडे, माजी सैनिक तालुका सेल शिवाजीराव चव्हाण,   व्यापारी संघटना अध्यक्ष चंद्रकांत गवळी, चंद्रकात मासाळ यांच्यासह इतर सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top