तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवाशी असलेल्या डॉ.रोहित अशोक जोशी यांला प्राग (झेक रिपब्लिक, युरोप) येथील चार्ल्स विद्यापीठ येथून भौतिक रसायन शास्त्र या विषयात पीएचडी मिळालेली आहे. 

त्यांनी मानसिक आजारांना कारणीभूत असणाऱ्या प्रथिनांवर अभ्यास व संशोधन केले आहे. मुख्यतः ubiquitin ligase आणि त्याचे 14-3-3 प्रथिनांद्वारे होणारे नियमन यांवर संशोधन केले आहे. त्या प्रथिनांचा रचनात्मक अभ्यास आणि कार्यपद्धतीवर संशोधन केले आहे.  ही प्रथिने मेंदू, किडनी, जठर, फुफ्फुसे, र्हदय या मुख्य अवयवांमध्ये कार्यरत असतात. तसेच ते पेशी मधील पेशीय भित्तिका आणि संलग्नित प्रथिनांनवर नियंत्रण ठेवतात व त्यांना लक्ष्य करतात. प्रथिनांचे अनियमन पेशीय रचना आणि वाढ मध्ये अडचण, श्वसनाचे आजार,  अल्जामर, हायपरटेंशन, इ. आजारांसाठी कारणीभूत असते. तसेच या प्रथिनांचे अनियंत्रन कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला देखील कारणीभूत होऊ शकते. मुख्यतः या प्रथिनांची विशिष्ट कार्यपध्तीचा वापर आपण संभाव्य आजाराचा धोका आणि आजारांवरील उपचारासाठी करू शकतो. या  प्रथिनांवरील संशोधनाचा फायदा भविष्यात विविध गंभीर आजारांवरील औषधनिर्मीतीसाठी होऊ शकतो. 

या संशोधनात डॉ. रोहित जोशी यांना  Dr. Veronika Obsilova (principle scientist, Institute of physiology, Academy of Sciences, Czech Republic (Europe))  यांनी मार्गदर्शन केले आणि Professor Tomas Obsil (HOD, Charles University, Prague, Czech Republic (Europe))  यांनी वैज्ञानिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले आहे. डॉ. रोहित जोशी हे तिन वर्षाचे आसतानाच त्यांच्यावरील वडीलांचे छत्र हारवले होते  डॉ . रोहित जोशी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरी, ता. बार्शी तसेच माध्यमिक शिक्षण शिवछत्रपती विद्या मंदिर, पांगरी, ता. बार्शी येथे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद कॉलेज, सोलापूर येथे केले आहे. लोकमंगल कॉलेज, वडाळा, सोलापूर येथे B.Sc Biotechnology  आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून M.Sc Environmental Biotechnology विषयात पदवी मिळालेली आहे. नंतर दक्षिण कोरिया या देशातून संशोधनाला सुरूवात केली. डॉ. रोहित जोशी यांनी विविध देशी आणि आन्तरदेशीय नामांकीत संशोधन संस्थामध्ये काम केले आहे. चार्ल्स युनिवर्सिटीत मध्य पीएचडी करताना डॉ. रोहित जोशी यांना  GAUK grant  मिळालेली आहे तसेच 2023 मध्ये फ्रान्स येथे झालेल्या FEBS conferenceĝ   मध्ये "Young Scientist Forum" मध्ये निवड झाली होती. सध्या डॉ.रोहीत जोशी हे  झेक रिपब्लिक देशांमध्ये BIOCEV  या संशोधन सेंटर मध्ये कार्यरत आहेत.त्याना पीएचडी मार्च 2024  ला मिळालेली आहे.


 
Top