धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 2007 मधील इयत्ता 10वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन व त्यांना अध्यापन करणाऱ्या  शिक्षकांचा शिक्षक मेळावा आयोजित केला होता.

प्रथम सर्व गुरुवर्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर यथोचित सत्कार सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुवर्यांचा करण्यात आला.

आपल्या या माजी विद्यार्थ्यांपुढे माजी उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, सेवानिवृत्त शिक्षक नाना हाजगुडे, रघुनाथराव आदटराव,अण्णाराव सुरवसे तसेच नूतन प्राथमिक विदया मंदिरचे मुख्याध्यापक प्रमोद गोरे, सूर्यकांत पाटील यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्रेमाताई सुधीर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या सहकार्यातून शाळेचा आणखी विकास आम्हाला करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पर्यवेक्षक सुनील कोरडे, नरेंद्र पाटील, विष्णू इंगळे, दत्तात्रय इनामदार, संतोष देशमुख, एस. के. आघाव, मनोज माने, नेताजी मुळे या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. तर या माजी विद्यार्थ्यांनी अगदी शाळेच्या घंटीपासून राष्ट्रगीत व अठरा वर्षापूर्वी ज्या वर्गात अध्ययनाचे धडे घेतले त्या वर्गात आपल्या अध्यापका सोबत पूर्वीचे क्षण अनुभवले. आपल्या अनेक आठवणीना यावेळी उजाळा दिला. अगदी नाश्यापासून संगीत, नृत्य व सहभोजनाचा आस्वाद आपल्या गुरूजनांसह शेकडो माजी विदयार्थ्यानी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी देशपांडे, शिवकुमार गिरी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता दीपक आदटराव, सागर माळवदकर, अजित भोरे, अजिंक्य गुंजाळ, अजिंक्य काळे सह प्रत्येकांनी प्रयत्न केला.

 
Top