धाराशिव (प्रतिनिधी)- 18 व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. एकीकडे उन्हाचा पारा सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीच्या आखाडा पेटला आहे. यामध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरूध्द महायुती यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले असून, दोघांमध्ये तगडी फाईट होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि. 24 एप्रिल रोजी तुळजापूर येथे शरद पवार यांची सभा झाली. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी धाराशिव येथे येत आहेत. ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. या मतदार संघातील वातावरण टाईट होताना दिसून येत आहेत.

धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, विश्व शक्ती पार्टी आदी पक्षासह 31 जणांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून आपल्याकडे मतदान खेचून घेण्यासाठी आपआपल्या नेत्यांच्या सभा मतदार संघात ठेवल्या आहेत. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे महाविकास आघाडी विरूध्द महायुती असाच सामना होण्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारार्थ आणखी वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे.


 
Top