धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार अर्जुन सलगर यांनी सोमवारी (दि.15) नामनिर्देशनपत्र दाखल केले.

यावेळी सचिन शेंडगे, अरुण जाधवर, श्रीमती सुहासिनी पाटील, ॲड.वाघमारे, बालाजी शिंगे, उमेश काळे, सुनील कानडे, रमाकांत लकडे, गणेश एडके, मच्छिंद्र सारुक, ज्ञानेश्वर पंडित, अक्षय माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याचे कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प इथे राबविण्यासाठी ही निवडणूक आपण लढवित आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी, बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एमआयडीसीचा विकास करण्यासाठी  काम करणार असून जनता आपल्या पाठीशी असल्यामुळे सर्वाधिक मताधिक्य आपणाला मिळणार असल्याचेही ते म्हणाले.


 
Top