धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज 15 एप्रिल 2024 रोजी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आर्यनराजे किसनराव शिंदे यांनी राष्ट्रीय समाज दल (आर),नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी (विश्व शक्ती पार्टी ) आणि अर्जुन सिद्राम सलगर यांनी (अपक्ष) म्हणून नामनिर्देशितपत्र दाखल केले. आज 23 व्यक्तींनी 59 अर्जाची उचल केली.दोन दिवसात 41 व्यक्तींनी 95 अर्जाची उचल केली तर 3 व्यक्तींनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले.


 
Top