धाराशिव (प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरातील गालिब नगर येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे प्रशांत साळुंके यांचेकडून आयोजन करण्यात आले. रविवारी सायंकाळी बिलाल मशीद मध्ये आयोजित इफ्तार पार्टीस गालिब नगरसह मिल्ली कॉलनी, शिरीन कॉलनी, रजा कॉलनी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून पार्टीचा आस्वाद घेतला.
यावेळी मौलाना यांनी इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे महत्त्व, नमाज अदा केल्यानंतर रमजान महिन्याबाबत करण्यात येणारे धार्मिक मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्रित बसून इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. शेवटी आयोजक प्रशांत बापू साळुंके यांनी पवित्र रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीला यावर्षीही मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी अजित बाकले तसेच गालिब नगरसह मिल्ली कॉलनी, शिरीन कॉलनी, रजा कॉलनी भागातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.