तुळजापूर (प्रतिनिधी)- वाढत्या तापमान पार्श्वभूमीवर सुती कपड्यामुळे गरम होण्याचे प्रमाण कमी होवुन उन्हाचा चटका जाणवत नसल्याने सध्या सुती कपड्याची मागणी स्ञी पुरुषांमध्ये वाढली आहे. त्यामुळे गड्या आपले सुती कपडेच बरे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य मधुन येत आहे. सध्या दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत तो चाळीस अंशावर पोहचला आणखी दोनमहिने उन्हाळ्याचे शिल्लक आहेत. सध्याच्या ऊन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे.
उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी नानाविध प्रकार केले जात आहे. सुती कापड हे आपल्या भागातील वातावरणाला सुट करते सुती कापडनिर्मीती भारतात मोठ्या प्रमाणात होते. माञ कालानुरुप सुती कपड्याला मागणी कमी होवुन टेरीकाँट सह अन्य कपड्यला मागणी वाढवी माञ सध्याच्या वातावरणात सुती कापड योग्य असल्याचे दिसुन आल्याने सुती कपड्या बाबतीत जुने ते सोने म्हणण्याची वेळ निसर्गाने आणली आहे. सध्या म्हणून सुती कपडे परिधान करण्याकडे कल वाढला आहे. त्यात ही पांढऱ्या रंगाच्या सुती कपड्याला मोठी मागणी वाढली आहे. सुती कपड्यांच्या मागणीत बाजारपेठेत वाढ झाली आहे. उन वाढत असल्याने बहुतांश जण दुपारी घरात राहणेच पसंत करत आहेत. बहुतांश भागातील रस्ते सुने पडले आहेत. मात्र ज्यांना कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते. त्यांना उन्हाचा चांगला तडाखा यंदा दरातही मोठी वाढ उन्हाचा पांढऱ्या कपड्यांचा सध्या तडाखा अधिक जाणवत असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत वापर वाढला आहे. प्लेन पांढऱ्या कपड्यांसह फुलांचे डिझाईन असलेले पांढरे कपडेही विक्री होत आहे. यंदा दरांमध्ये सुध्दा वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. उन्हापासून बचावासाठी त्यांच्याकडून विविध प्रकार अवलंबले जात आहे. पांढऱ्या कपड्यांनी उन्हाचा चटका कमी जाणवत असल्याने रुमाल गमजे पांढरे शर्ट, पॅन्ट, बंडी तर महिलांकडून पांढरे टॉप, कुर्ता, पंजाबी ड्रेस, साडी, लेगीज परिधान करण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात अशाप्रकारचे पांढरे कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. दुकानांमध्येही पांढरे कपडे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. सुती कपड्यांमुळे गरम होण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाचा चटका जाणवत नाही. शिवाय त्यांचे वजनही कमी असल्याने उन्हाळ्यात अशा कपड्यांची अधिक मागणी असते. पूर्वी केवळ साधे शर्ट आणि बंडी विक्रीस येत. सध्या बदलत्या युगाप्रमाणे नागरिकांची कपड्यांची बदलती पसंती लक्षात घेता, टी-शर्टपासून ते महिलांसाठी कुर्तीपर्यंत पारंपारिक तसेच वेस्टर्न पांढरे पोशाखही विक्रीस येत आहेत.