तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे शनिवारी (दि. 30) रंगपंचमी साजरी करत असताना दोघा भावंडावर केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ रंगात टाकून तो रंग अंगावर टाकण्यात आल्याने ते दोघे चांगलेच होरपळले आहेत. या चिमुकल्यांना अखेर पुढील उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आले आहे. या घटनेने तिर्थक्षेञ तुळजापूर चांगलेच हादरुन गेले आहे. यात सहा ते सात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने पोलिस हे प्रकरणकाळजी पुर्वक हाताळत आहेत.

सदरील मुला पैकी एक जण नगरपरिषद शाळेत तर दुसरा शिंदे प्रशालेत शिकत आहे. यांची दुश्मणी कुणाशी असणार. या देखण्या दिसणाऱ्या मुलांवर केमिकल युक्त ज्वलनशील रंग टाकणे प्रकाराच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असुन खऱ्या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी होत आहे. सदरील केमिकल युक्त ज्वलनशील. पदार्थ  घरी कशासाठी आणले होते. कुठुन आणले व सदरील अल्पवयीन मुलांच्या हाती कसे पोहचले याचा तपास होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे दोन भावंडाच्या अंगावरच हे ठाकले जाते. त्यामुळे  या घटने मागे मुळ काय  कारण आहे का याचा शोध घेणे काळाची गरज बनली आहे. रंग हा घरी बदलीत केला जातो. बाटलीत नसतो त्यामुळे हे प्रकरणाचे गुढ वाढले आहे. सदरील टाकणारे मुले गल्लीतीलच आहेत. सदरील प्रकरणात अल्पवयीन मुलांचा  सहभाग  असले तरी  यामागे काही प्लँनिंग तर नाही ना याचा ही शोध घेणे गरजेचे आहे. एकंदरीत तिर्थक्षेञ तुळजापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याने शहरवासियांसह पालक वर्ग चांगलाच हादरुन गेला आहे.

विशेष म्हणजे घटना रंगपंचमीच्या सकाळी घडते व दुसऱ्या दिवशी दुपारी गुन्हा दाखल होतो. ते ही सोशल मिडीयावर चिमुकल्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे बरेच काही सांगुन जाते. या घटनेने पालकांची जबाबदारी वाढली आहे. मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचच बनले आहे.


केमिकल कुठले, कुठुन आले याचा शोध घ्यावा

तुळजापूर येथील विवेकानंद भागातील दोन चिमुकल्यांवर रंगपंचमी दिनी शनिवार दि. 30 रोजी सकाळी आठ वाजता काळ्या निळ्या रंगाच्या दोन लीटर बाटलीतील रंग अंगावर  टाकल्याने  यात  दोन चिमुकले यामुळे भाजले गेले होते. सदरील चिमुकल्याचे सोशल मिडीयावर वायरल भयानक चिञ पाहुन या प्रकरणी सदरील बाटलीत केमिकल कुठले होते, कुठुन आले, याचा शोध घेण्याची मागणी शहरवासियांन मधुन होत आहे.


 
Top