धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी आदित्य दिपकराव गवळी याची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत सोलापूर झोन फुटबॉल स्पर्धा डिसेंबर २०२५ मध्ये पार पडल्या. या स्पर्धेत काझी मोहम्मद, काम अदनान, सय्यद शाबिब, महेबूब शेख, आदित्य गवळी, अयान शेख, अम्मार खान, समीद खान, रशाद वर्क, जुनेद शेख, साद मोमीन, राहुल अडसुळे, अब्दुल खदीर, काझी मोहम्मद अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सहभागी विद्यार्थ्यांमधून आदित्य दीपक राव गवळी याची उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही निवड चाचणी संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पन्हाळा (कोल्हापूर) येथे घेण्यात आली होती. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण पाटील यांनी आदित्य गवळीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुरज ननवरे, प्रा. तुषार ताकभाते, प्रा. प्रशांत कोरके, प्रा. स्नेहल साखरे, प्रा. काजल काशीद, वरिष्ठ लिपिक बालाजी मुंडे व कनिष्ठ लिपिक अजित शिनगारे यांनीही अभिनंदन केले.
