तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात वाढत्या तापमान पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी भवानी रोडवर मंडप उभारुण श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाँ. सचिन ओंबासे च्या संकल्पनेतुन मंदीर महाध्दार तसेच भवानी रोडवर लोंखडी अँगलचा मंडप  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने उभारला होता. त्यामुळे भाविकांना असाह्य उष्णतेपासुन सुटका मिळाली होती. यंदा माञ अत्यल्प पावसामुळे तापमान चाळीस अंशावर गेले असुन, सुर्य दुपारी आग ओंकत असल्यामुळे सकाळी अकरा नंतर भवानी रोडवरील सिमेंट रस्ता तापत आहे. खालुन वरुन उष्ण वातावरण निर्माण होत असल्याने दिपक चौक ते मंदीर हा रस्ता उन्हाळ्यात दुपारी काटणे भाविकांना ञासदायक ठरले आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने मागील वर्षी  लोखंडी अँगलचा सांगडा बनवला आहे.  तो सांगडा उभारुन भवानी रोडवर सावली करुन दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.


 
Top