उमरगा (प्रतिनिधी)-धाराशिव येथील पत्रकार,कवी  व साहित्यिक रवींद्र केसकर यांच्यावरील हल्ल्याचा तालुका पत्रकारांच्यावतीने मंगळवारी (दि 02) तीव्र निषेध करीत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदार गोविंद येरमे व पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रविंद्र केसकर यांचे अपहरण करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी (दि.01) रात्री हा प्रकार घडला. श्री केसकर हे कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंके नगर बेंबळी रोड या भागात मारहाण केली. या दरम्यान चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे.  केसकर या हल्ल्यातून बचावले असून त्यांची दुचाकी चोरून नेण्यात आली. ही दुचाकी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात टाकून देण्यात आली. मात्र या हल्ल्याचा प्रयत्न का झाला, या मागचे सूत्रधार कोण आहेत, पत्रकारांना टार्गेट का केले जातेय, असे प्रश्न निर्माण होत आहेत. सदरील प्रकरनाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने निवेदन देण्यात येत आले. पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर पत्रकार अविनाश काळे, नारायण गोस्वामी, अंबादास जाधव, जाफर जमादार, शंकर बिराजदार, समीर सूतके, गोळप्पा  कांबळे, अमोल पाटील, प्रदीप भोसले, महादेव पाटील, सुभाष जेवळे, माधव सूर्यवंशी, तानाजी घोडके, युसूफ मुल्ला, सुमित कोथिंबरे, आकाश पोतदार, देवीसिंग राजपूत, महेबूब पठाण, विकास गायकवाड, विश्वास सोनकांबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top